बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्व ७ आरोपीना मोक्का लागल्यानंतर वाल्मिक कराड याला खंडणीच्या प्रकरणात मोक्का का लावला नाही म्हणून आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे, आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्य सरकारला सवाल विचारला आहे. धाराशिव इथे हत्या प्रकरणात न्याय मागण्यासाठी आज जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले गेले. त्यात आमदार सुरेश धस सहित अनेक नेते सहभागी झाले होते. दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडला बदनाम केल्याचा आरोप धस यांच्यावर केला आहे. या सर्व घडामोडींचे विश्लेषण केले आहे. मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.
In the Santosh Deshmukh murder case from Beed, all seven accused were charged under MCOCA. However, questions are now being raised as to why Valmik Karad has not been charged under MCOCA in the extortion case. Maratha community leaders Manoj Jarange, MLA Sandeep Kshirsagar, and MP Bajrang Sonawane have posed this question to the state government.A "Janakrosh Morcha" was organized in Dharashiv today to demand justice in the murder case, with participation from leaders including MLA Suresh Dhas. On the other hand, Minister Pankaja Munde has accused Dhas of defaming Beed.Max Maharashtra's editor Manoj Bhoyar has analyzed these unfolding developments.