आज राज्यात ६ हजार कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. काल १८ मेला राज्यात २८,४३८ नवीन रुग्ण आढळले होते. आज राज्यात नवीन ३४,०३१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर दुसरीकडे राज्यात आज ५९४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४% एवढा आहे.
आज ५१,४५७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४९,७८,९३७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.०६% एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,१८,७४,३६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,६७,५३७ (१७.१५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ३०,५९,०९५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,८२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -
राज्यात आज रोजी एकूण ४,०१,६९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे.