राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत लॉकडाऊन लावूनही कमी होताना दिसत नाही. आज राज्यात ६७ हजार १६० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर ६३,८१८ रुग्ण आज बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३४,६८,६१० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.०२ एवढे झाले आहे.
राज्यात आज ६७६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,५४,६०,००८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४२,२८,८३६ (१६.६१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात ४१,८७,६७५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,२४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,९४,४८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.