'मन की बात'चा या वर्षीचा आज शेवटचा कार्यक्रम; पंतप्रधान मोदी काय बोलणार? याकडे देशाचं लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता 'मन की बात'मधून देशवासियांना संबोधित करणार आहे.आज देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी काय बोलणार? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे;
नवी दिल्ली// पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता 'मन की बात'मधून देशवासियांना संबोधित करणार आहे. या वर्षातील ही शेवटची मन की बात असणार आहे. कालच 12 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण, बुस्टर डोसबाबत मोठी घोषणा केल्यानंतर आज देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी काय बोलणार? याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान मोदींनी काल रात्री देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोसबाबत महत्त्वाची घोषणा केली.
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता होणाऱ्या 'मन की बात' कार्यक्रमाचा आजचा 84वा भाग आहे.
नोव्हेंबर 2021 च्या मागील 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलिया आणि बुंदेलखंडच्या झाशीचं एक वेगळं नातं असल्याचं म्हटलं होतं. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. आज 26 डिसेंबर रोजी प्रसारित होणारा 'मन की बात' हा कार्यक्रम या वर्षीचा शेवटचा कार्यक्रम असेल.