तबलीगी जमात ते कुंभ मेळा, गोदी मीडिया आता गप्प का? नेटिझन्सचाचा संताप

तबलीगी जमात ते कुंभ मेळा, गोदी मीडिया आता गप्प का? नेटिझन्सचाचा संताप kumbh mela and tablighi jamaat gathering are not the same in covid pandemic situation people ask question to godi media 
;

Update: 2021-04-12 11:23 GMT

Courtesy: The Quint

कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुस्लीम समाजाचा दिल्लीच्या निजामुद्दीन भागात 15 ते 17 मार्च २०२० या दरम्यान एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमादरम्यान कोरोना वाढल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं होतं.

"देशात सध्या 1,637 कोरोना व्हायरसचे रुग्ण आहेत, आणि गेल्या 24 तासात हा आकडा 386 नी वाढला आहे. ही वाढ प्रामुख्याने तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांमुळे झाली आहे," अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली होती.

यावेळी भारतातील अनेक माध्यमांनी देखील हीच भूमिका घेतली होती. समाजमाध्यमांवर मुस्लीम समाजामुळे कोरोना वाढला. अशा पोस्ट करण्यात आल्या होत्या. यावर आता उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. माध्यमांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण सध्या उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये १२ एप्रिलला कुंभमेळाच्या सोमवती अमावस्येच्या दिवशी 'शाही स्नान' करण्यासाठी जी गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीमध्ये कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टंसिंगचं पालन करत नसल्याचं दिसून येते आहे. त्यामुळे आता कोरोना वाढत नाही का? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात असून माध्यमांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

नेटिझन्सनी गोदी मीडियाला सवाल केला असून आता कोरोना वाढत नाही का? असं म्हणत ट्रोल केलं आहे.


श्रीवत्स या ट्विटर मीडिया युजरने


तबलीगी जमातच्या कार्यक्रमात २५०० लोक सहभागी झाले होते. यामध्ये १००० लोक पॉझिटीव्ह आले होते. यावेळी कोरोना वाढण्याचा सिंगल सोर्स हे तबलीगी जमातचा कार्यक्रम असल्याचं गोदी मीडियाने म्हटलं होतं. मात्र, आता गोदी मीडियात ही हिंम्मत आहे का? जेव्हा कुंभ मेळाव्यात लाखो लोक सहभागी होत असतील आणि दिवसाला १ लाख ७० हजार रूग्ण आढळत असतील. अशा वेळेला कुंभ मेळावा हा कोरोनाचा सिंगल सोर्स असं म्हणण्याची हिम्मत गोदी मीडियात आहे का?

असा सवाल केला आहे.

इरफान या व्यक्तीने देशातील काही संपादकांचे फोटो टाकले असून जर त्यांनी तबलीगी जमात प्रमाणे कुंभ मेळ्याला दोष दिला तर काय होईल? असा सवाल केला आहे.

मागच्या वर्षी माध्यमांनी तबलीगी जमातच्या विरोधात प्रापोगंडा चालवला. आता माध्यमं त्याच प्रमाणे कुंभ मेळा हा कोरोनाच्या संसर्गाला जबाबदार आहेत. असं वार्तांकन करतील का? असा सवाल केला आहे. ही माध्यमांची भूमीका डबल स्टॅंटर्ड आहे.

दरम्यान हा कुंभमेळा ३० एप्रिल पर्यंत चालणार आहे. तोपर्यंतच जर अशीच परिस्थिती सुरु राहिली तर काय परिस्थिती होईल? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Tags:    

Similar News