भास्कर पेरे यांना "कर्मयोगी पुरस्कार" जाहीर.

Update: 2024-12-18 17:02 GMT

भास्कर पेरे यांना महाराष्ट्रातील सन्मानजनक समजला जाणारा कर्मयोगी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी ग्रामविकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन नवभारत शिक्षण मंडळ, प्राचार्य डॉ.पी.बी. पाटील सोशल फोरम आणि शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवार यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे. याबाबत संस्थेचे संचालक गौतम पाटील यांनी माहिती दिली आहे.

कर्मयोगी पुरस्कार हा महाराष्ट्रातील नामवंत पुरस्कारांपैकी एक आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील (आबा) यांच्या दूरदृष्टीतून संस्थेने सन २०१२ पासून ही राज्यस्तरीय पुरस्कार योजना अंमलात आणली आहे. समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या आणि आपल्या कार्यातून मानवी जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.

यामध्ये "शाल, फेटा, मानपत्र, सन्मानचिन्ह व रु.१ लाख रोख" असे या पुरस्काराचे स्वरुप असते.

आत्तापर्यंत हे पुरस्कार पुढील प्रमाणे मिळाले आहेत (२०१२)साली डॉ. शांतारामजी पोटदुखे, (२०१३) डॉ. राणी बंग, (२०१४) डॉ. तात्याराव लहाणे, (२०१५) डॉ.रविंद्र कोल्हे व स्मिता कोल्हे, (२०१६) डॉ. गिरीष कुलकर्णी, (२०१७) श्री. पोपटराव पवार, (२०१८) रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील तसेच (२०१९) लोककलावंत मधुकर पांडुरंग नेराळे तसेच (२०२०) धोर शाखज डॉ. शिवराम भोजे तसेच (२०२२) सह्याद्री फार्मस, नाशिकचे श्री. विलासराव शिंदे तसेच (२०२३) कॉम्रेड जिवा पांडु गावित, नाशिक, (२०२४) येवला पैठणीचे श्री. बाळकृष्ण कापसे यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दूरदृष्टी लाभलेले प्रगल्भ व्यक्तीमत्व,गरिबीवर मात करुन गावकऱ्यांच्या अडचणी ओळखून सरपंच म्हणून केलेले काम, समाजाचे जीवनमान उंचावणारे ठरले असून,भास्कर पेरे यांच्या कार्याची दखल राज्य व देश पातळीवर घेण्यात येत आहे

कर्मयोगी पुरस्कार प्रदान सोहळा हा संस्थेचे संस्थापक दिवंगत प्राचार्य डॉ.पी.बी. पाटील यांच्या जयंतीदिनी रविवार दि.१४ जानेवारी २०२५ रोजी शांतिनिकेतन लोकविद्यापीठ, साखर कारखान्यासमोर, सांगली येथे साजरा होणार आहे.

Tags:    

Similar News