Chiplun : मुंबई - गोवा महामार्गवरील परशुराम लोटे आणि चिपळूणकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी कळंबस्ते फाटा येथे निवारा शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होतं आहे. कर्मचारी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरीकांची महामार्गावरच उभे रहावं लागत आहे. येथील स्थानिकांनी याठिकाणी निवारा शेड बांधण्याची मागणी केली होती परंतू याकडे दुर्लक्ष केले जातयं
कळबंस्ते फाट्यावर हजारो लोकं ये-जा करत असता. एमआयडीसी लोटे तसेच चिपळूण ला जाणाऱ्या शाळेतील मुलं ,महिला, कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. दिवसेंदिवस कामगारांची रहिवाशांची संख्या वाढत आहे, महामार्ग असल्याने वाहने ही भरधाव वेगाने असतात. या ठिकाणी लहान मोठे अपघात झालेले आहेत, काही वेळा तर बस थांबत देखील नाही. धावपळीमुळे एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता असल्याने कळंबस्ते फाटा हा अपघाताचे निमित्त ठरू शकतो अशी प्रतिक्रिया चिपळूण तालुका विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष रुषिकेश शिंदे यांनी दिली आहे.
निवारा शेड नसल्याने कामगारांना व परिसरातील नागरिकांना ऊन पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. कळंबस्ते फाट्यावर बस थांबा निश्चित माहिती नसल्याने बसचालक बसही थांबवत नाहीत. बस आल्यावर धावपळ होऊन रस्त्यात अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. मात्र, याकडे लोकप्रतिनिधी असो किंवा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कळंबस्ते फाटा लवकारत लवकर ही निवारा शेड उभारण्यात यावी अशी मागणी येथील स्थानिक करत आहेत