Shashikant Warishe Case : शशिकांतची हत्या म्हणजे पूर्वनियोजित कटच : आरोपी आंबेरकरची कबुली
राजापूर येथील पत्रकारShashikant Warishe Case यांची हत्त्या म्हणजे पूर्वनियोजित कटच होता अशी कबुली या प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यांनी दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार आरोपी आंबेरकरने गुन्ह्याची कबुली दिली आहे.. आंबेरकर सध्या पोलीस कोठडीत असून काल न्यायालयाने आणखी दोन दिवस पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.
तपासा दरम्यान पोलिसांना आंबेरकरचे बँक खाते तसेच कॉल रेकॉर्डचे तपशील मिळाले आहेत. या कृत्यात आणखी काही लोक गुंतले आहेत का? हे तपासण्यासाठी आम्ही त्याची छाननी करत आहोत. असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वीच्या प्रकरणांची आणि आरोपींविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारींचीही माहिती मिळाली आहे. त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. रिफायनरी विरोधी कार्यकर्त्यांना धमकावणे आणि मारहाण करणे. कारण तो रिफायनरी समर्थक होता आणि प्रकल्पासाठी भूसंपादन सोपे व्हावे यासाठी काम करत असे. आम्ही या मागील प्रकरणे आणि तक्रारी पाहतो आहोत असेही पोलिसांनी सांगितेल.
शशिकांत वारिशे हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी १२ सदस्यांचे एक तपासणी पथक स्थापन केले आहे.