भारताचे माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. 1961 मध्ये सुरु झालेला अर्जुन पुरस्कार पहिल्यांदा प्राप्त करण्याचा मान नंदू नाटेकर यांना प्राप्त झाला होता. ते 88 वर्षांचे होते. पुणे येथे त्यांचं निधन झालं.
पहिले अर्जुन पुरस्कार प्राप्त बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..#Rip💐#nandu_natekar pic.twitter.com/xYm5rXTe01
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 28, 2021
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बॅडमिंटनपटू श्री. नंदू नाटेकर यांचे निधन दुःखदायक आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 28, 2021
आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त करणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू व क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कारावर नाव कोरणारे पहिले खेळाडू.
नाटेकर कुटुंबीयांच्या दुःखात सहसंवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!