धार्मिक स्थळांवर सीसीटिव्ही लावायचा निर्णय ऐच्छिक - गृहमंत्री दिलिप वळसे पाटील

Update: 2022-04-20 12:44 GMT

मनसे (Mns)गुढीपाडव्याच्या सभेनंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackrey)यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासंदर्भात शासनाला ३ मेपर्यंत अल्टीमेटम दिला आहे.त्यातच मनसे नेते (bala nadgoakar) बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारकडे एक मागणी केली आहे.मंदिरात सीसीटीव्ही लावले आहेत तर मशिदीत सीसीटिव्ही का नाहीत असा प्रश्न उपस्थित केला.त्यांच्या या प्रश्नाचा गृहमंत्री वळसे पाटलांनी एका वाक्यात निकाल लावला.

मंदिरात सीसीटीव्ही कंपलसरी लावण्यासंबंधी कुणी सूचना दिलेल्या नाहीयेत. मंदिरात स्वेच्छेने किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावले असतील किंवा इतरही धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही लावायचे असतील तर सरकारचा विरोध असण्याचं काही कारण नाही. ज्याने त्याने आपापल्या स्वच्छेने निर्णय घ्यावा, सरकारचं काही म्हणणं नाही. हा निर्णय पूर्णत: ऐच्छिक असल्याचं देखील गृहमंत्र्यांनी (Home minister)ठासून सांगितलं. एकंदर मनसेच्या प्रश्नाचा गृहमंत्र्यांनी एका वाक्यात निकाल लावला.

कुठल्याही कायद्यामध्ये स्पीकर लावणे किंवा उतरवणे हे सरकारचं काम नाही, सरकारची जबाबदारी नाही. ज्याला लाऊड स्पीकर लावायचा आहे, त्याला पोलिसांनी परवानगी घेऊनच लाऊड स्पीकर लावता येतील, अशा स्पष्ट शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.धार्मिक स्थळांवर सीसीटिव्ही लावायचा निर्णय ऐच्छिक- गृहमंत्री दिलिप वळसे पाटील

Tags:    

Similar News