..अन्यथा भाजप खासदारांना ठोकणार; हर्षवर्धन जाधवांचा इशारा
भाजप खासदारांनी मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा;
फडणवीस सरकारच्या काळात मिळालेलं मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्यानंतर आता मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. तर भाजप खासदारांनी मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा त्यांना ठोकणार असा इशारा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं, त्यावेलीचं हे आरक्षण टिकणार नसल्याचं मी म्हणालो होतो. त्यामुळे आता जर मराठा समाजाला आरक्षण हवे असेल तर, त्यासाठी केंद्र सरकारलाच कायदा करावे लागणार आहे. त्यामुळे भाजपच्या खासदारांनी केंद्राकडे यासाठी मागणी करावी, अन्यथा त्यांना हे महागात पडेल असही जाधव म्हणाले.