भगतसिंह कोश्यारी यांनी केला पूरग्रस्त भागांचा दौरा
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. यावेळी बोलतांना राज्यावरील आलेल्या या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करेल असं राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
महाड : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. यावेळी बोलतांना राज्यावरील आलेल्या या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार समन्वयाने काम करेल असं राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटलं आहे. या महापुराचा राज्याला मोठा फटका बसला आहे. या संकटातून राज्य लवकर बाहेर येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या चिपळूण आणि महाडमधील दरडग्रस्त तळीये गावाला त्यांनी भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते .
मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणाला मोठा फटका बसला असून, दरडीखाली गेलेल्या तळीये गावाची राज्यपाल कोश्यारी यांनी पाहणी केली. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना त्यांनी श्रध्दाजंली वाहीली. अतिवृष्टीमुळे कोकणातील जनजीवन पुरत विस्कळीत झाले असून तळीये गावातील 53 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या महापुरामुळे मोठी जीवितहानी खुप मोठी असून , त्यांच्या कुटुंबाची ही हानी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो असं राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटलं आहे. सोबतच महापूर ग्रस्तांना सरकार सर्वतोपरी मदत करेल. असंही त्यांनी म्हटलं आहे.