भुजबळांच्या बालेकिल्ल्यातून शरद पवारांचा यल्गार लढू आणि जिंकू शरद पवारांचे नवे घोषवाक्य
पक्षफूटीनंतर शरद पवार यांची महाराष्ट्रातील पहिली सभा येवल्यात होणार आहे.;
महाराष्ट्रात अजित पवारांनी बंड केल्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पडली. याच धर्तीवर येवल्यातील भुजबळांचे एकेकाळी खंदे समर्थक असलेले अॅड.माणिकराव शिंदे यांनी आज शरद पवारांची मुंबई येथे भेट घेतली. येवल्यातील छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांची महाराष्ट्रातील पहिली सभा घेण्यात येणार असल्याची माहिती अॅड.माणिकराव शिंदे यांनी दिली आहे. लढू आणि जिंकू अशी पवारांच्या सभेची घोषणा असणार आहे, असे देखील शिंदे म्हणाले आहेत.