जळगावातील रायसोनी क्रेडीट सोसायटीमधील् गैरव्यवहार प्रकरणी छापे
EOW of pune police raids in jalgaon in BHR corruption case
जळगावमधील BHR म्हणजेच भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट को.ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीमधील अपहार, फसवणूकप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाच वर्षांपासून अवसायकाच्या नेमणुकीच्या काळात झालेल्या अपहारासह 'बीएचआर'च्या कोट्यवधींच्या मालमत्तेची कवडीमोल दराने खरेदी केल्याप्रकरणी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या 100 जणांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. जळगावातील अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या घरावर, संस्थेचे एमआयडीसीतील मुख्य कार्यालय, उद्योजक सुनील झंवर, पतसंस्था ठेवीदार संघटनेचे विवेक ठाकरे आदींच्या निवासस्थानी देखील छापे टाकण्यात आले. या तपासणीत लाखोंच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकडही जप्त करण्यात आली आहे. तर काही संशयितांकडे सरकारी बनावट शिक्के आढळून आले आहेत.
काय आहे प्रकरण?
रंजना खंडेराव घोरपडे (निवृत्त माध्यमिक शिक्षिका, रा.वृंदावन सोसायटी भोसले नगर, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपी सुजित सुभाष बाविस्कर उर्फ वाणी,
धर्मकिशोर सांखला, महावीर मानक जैन, विवेक देविदास ठाकरे, माहेश्वरी, अवसायक जितेंद्र खंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, योगेश सांखला इतरांनी मिळून १७ लाख ८ हजार ७४२ रुपयांचा अपहार व फसवणूक केल्याचा आरोप कऱण्यात आला आहे. तसंच रक्कम परत करण्यासाठी आरोपींनी ठेवीदारांकडून १८ हजार ६०० रुपये घेऊन फसवणूक व अपहार केल्याची त्यांची तक्रार आहे. दरम्यान, अटकेतील चारही आरोपींना ६ डिसेंबर २०२० पर्यंत कोठडी सुनावली आहे.