शिवसेना नेते आनंदराव अडसळूंच्या घरी EDचा छापा, अडसूळ यांची प्रकृती बिघडली

Update: 2021-09-27 08:57 GMT

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरावर EDने छापा टाकला आहे. सिटी को ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी आनंदराव अडसूळ यांना ईडीने आज हजर राहण्याची नोटीस बजावली होती. या दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी अडसूळ यांच्या कांदिवली इथल्या घरी छापा टाकला. या कारवाई दरम्यान आनंदराव अडसूळ यांची चौकशी करण्यात येत असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर अडसूळ यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्यात आले. सध्या त्यांच्यावर गोरेगाव येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अडसूळ यांना ताब्यात घेऊन ईडीच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी आणले जाणार होते, पण त्याआधीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आता हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्यात आले आहे. आता या कारवाईचे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी स्वागत केले आहे. अडसूळ यांनी सिटी कोऑपरेटीव्ह बँक बुडवली आणि त्याचा फटका सर्व सामान्य ग्राहकांना बसला आहे, अशी टीका केली आहे.

Tags:    

Similar News