उजनी धरण 100 टक्के भरले; भीमा नदी पात्रात 40 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

Update: 2021-10-11 03:22 GMT

पंढरपूर :  पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात येणाऱ्या पाण्यात आवक सुरूच आहे. धरण 100 टक्के भरले असल्याने सध्या उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. रात्री अकरा वाजता धरणातून चाळीस हजार क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत. याच पार्श्वभूमीवर भीमा नदीकाठच्या नागरिकांना पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामत प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे धरण 100 टक्के भरले आहे. धरणातून कालपासून भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. दोन्ही कालव्याद्वारे 1 हजार. तर सीना माढा बोगद्यातून 148 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, दरम्यान पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये असे आवाहन पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी केले आहे.

Tags:    

Similar News