वरणगाव नगरपरिषदेवर शिवाजीनगर येथील ग्रामस्थांचा डफडी मोर्चा

Update: 2021-09-29 12:01 GMT

जळगाव :  वरणगाव नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या शिवाजीनगरमधील नागरिकांनी आज नगरपरिषदेवर डफडी बजाव मोर्चा काढला होता, यामध्ये शिवाजीनगरमधील खालील भागातील रहिवासी महिला पुरुष मोठ्या संख्येने सामील झाले होते.

भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील शिवाजीनगर मधील खालील भागांमध्ये रस्ते ,गटारी, पिण्याच्या पाण्याची समस्या आरोग्याची समस्या याकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याची आरोप आंदोलकांनी केला आहे, सध्या पावसाळा सुरु असून रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांना ये-जा करण्यासाठी अत्यंत हालअपेष्टा सहन करावा लागत आहेत, पिण्याचे पाणी वेळेवर येत नाही आरोग्यासाठी असणाऱ्या सुविधांचा याठिकाणी आभाव आहे, वारंवार नागरिकांनी नगर परिषदेला निवेदने देऊनही याकडे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मात्र दुर्लक्ष केले आहे ,म्हणून आज स्थानिक रहिवाशांनी वरणगाव नगरपरिषदेवर डफली वाजवत मोर्चा काढला, आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Tags:    

Similar News