पुण्यात सायबर सुरक्षा उपक्रमाला सुरवात

Update: 2024-02-29 05:11 GMT

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर (MCCIA) कार्यक्रमात पुण्यात सायबर सुरक्षा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अमेरिकन कौन्सिल जनरल तसेच इस्त्रायल कौन्सिल जनरल व महाराष्ट्र चेंबर ॲाफ कॅामर्स, इंडस्ट्री ॲंन्ड ॲग्रिकल्चर यांच्या सयुंक्त विद्यमाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. हा उपक्रम सायबर संरक्षणास बळ देण्यासाठी आणि डिजिटल जगतात आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या कार्यक्रमात यूएस (US) कौन्सिल जनरल माईक हॅन्की यांची उपस्थिती होते. मॅक्सवुमन संपादिका प्रियदर्शिनी हिंगे यांच्याशी त्यांनी संवाद साधला असता त्यात वाढत्या सायबर धोक्यांना संबोधित करण्यासाठी जागतिक तज्ञांना जोडण्यासाठी सायबर सुरक्षा केंद्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर त्यांनी भर दिला. कौन्सिल जनरल हॅन्की यांनी आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि वेगवान तंत्रज्ञानाच्या प्रगतीने माहितीचा मुक्त प्रवाह सुरक्षित होण्यासाठी सायबर स्पेसची आवश्यकता अधोरेखित केली.

"आजच्या डिजिटल युगात, सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांच्या प्रगतीसाठी सायबरसुरक्षा सर्वोपरि आहे. पुण्यातील सायबरसुरक्षा सेंटर ऑफ एक्सलन्सचे लॉन्च हे संवेदनशील माहितीचे संरक्षण आणि सायबर संरक्षणास बळ देण्यासाठी युनायटेड स्टेट्स (America)आणि भारत यांच्यातील खोलवर रुजलेल्या सहकार्याचे प्रतीक आहे. " असे यावेळी कौन्सिल जनरल हॅन्की यांनी अधोरेखीत केले तसेच दोन मोठ्या लोकशाहीवादी देशाने सायबर सुरक्षेसाठी उचलेले पाउल हे निश्चितच योग्य दिशा देणारे ठरेल. पुण्यात अनेक अमेरिकन कंपनी काम करतात तसेच दोन्ही देश सायबर विश्वात विवीध प्रकारची कामे करतात त्यामुळे सायबर विश्व सुरक्षीत असने अत्यंत महत्वाचे आहे.” असे कौन्सिल जनरल हॅन्की यांचे म्हणणे आहे.

MCCIA चे अध्यक्ष, दीपक करंदीकर आणि महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी सायबर सुरक्षा पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आणि डिजिटल मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी केंद्राचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करत भावना व्यक्त केल्या.

या उपक्रमाचा उद्देश संशोधन संस्था, उद्योग आणि नागरी समाज यांच्यात सायबर संरक्षण मजबूत करून, सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि इंटरनेट प्रशासनाला प्रोत्साहन देऊन, भागीदारी वाढवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. क्षमता-निर्मिती आणि संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करून, पुण्यातील सायबरसुरक्षा सेंटर ऑफ एक्सलन्स सायबर सुरक्षा धोके कमी करण्यासाठी आणि जागतिक समृद्धी आणि स्थिरता सुलभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

डिजिटल क्रांतीने जगभरात समाज आणि अर्थव्यवस्थांचा आकार बदलणे सुरू असल्यामुळे, सायबरसुरक्षा उपक्रमासारखे सहयोगी प्रयत्न विकसित होत आहेत. तसेच सायबरसुरक्षा लँडस्केपला संबोधित करत डिजिटल परिवर्तनाचे फायदे सुरक्षितपणे वापरण्यासाठी राष्ट्रांची वचनबद्धता ठेवणे गरजेचे आहे.

या उपक्रमाव्दारे निर्माता कौशल्याला वाव मिळणारच आहे त्या बरोबर रोजगार निर्मिती होऊन सायबर सुरक्षेवरही काम होणार आहे जे सुरक्षीत सायबर जग तयार करण्यासाठी मदत करेल.

Full View

Tags:    

Similar News