बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 जणांवर गुन्हा दाखल
राज्य मंत्रीमंडळाने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी जमलेल्या बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.;
राज्य मंत्रीमंडळाने सुपरमार्केट आणि किराणामालाच्या दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला. या निर्णयाला राज्यतील विरोधी पक्ष भाजपसह अनेक संघटनांनी विरोध दर्शवला. तर गुरूवारी सातारा येथे व्यसनमुक्ती युवक संघाच्यावतीने राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी बंडातात्यांसह जमलेल्या 125 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य मंत्रीमंडळाने सुपरमार्केट आणि किराणामालाच्या दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला. त्यावरून संमिश्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात होत्या. तर राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सातारा येथे बंडातात्या कराडकर यांच्यासह जमलेल्या 125 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात बंडातात्या कराडकर यांनी सातारा येथे व्यसनमुक्ती युवक संघाच्यावतीने दंडवत दंडुका आंदोलन केले. यावेळी व्यसनमुक्ती युवक संघाने बेकायदेशीर जमाव जमवत आंदोलन केल्याप्रकरणी जेष्ठ किर्तनकार बडातात्या कराडकर यांच्यासह 125 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी माहिती देतांना सांगितले की, कोणतीही परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी प्रकाश सदाशिव जत्रे उर्फ बंडातात्या कराडकर रा.-करवडी तालुका -कराड. जिल्हा. सातारा यांच्यासह 125 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना नियमावली जाहीर करताना सातारा जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 जणांनी कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37(1) (3) /135आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 ब साथरोग अधिनियम 1887चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बंडातात्या कराडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.