देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकृतीत सुधारणा :लवकरच डिस्चार्ज होणार

कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेत असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तब्बेतील सुधारणा असून डिस्चार्ज बाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे आरोग्य शिक्षणसंचालक डॉ.तात्याराव लहानेंनी `मॅक्स-महाराष्ट्र`शी बोलताना सांगितले.;

Update: 2020-11-01 09:10 GMT

फडणवीस यांच्यावर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता. मागील रविवारी देवेंद्र फडणवीस यांना प्लाझ्मा थेरपीचा एक डोस देण्यात आला होता. यानंतरही आणखी एक डोस देण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्यामुळे त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागली होती. फडणवीस यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही 93 पर्यंत खाली घसरली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सलग पाच दिवस रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले.

एकदाही त्यांना कृत्रीम ऑक्सीजन देण्यात आला नाही. त्यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 97 पर्यंत वाढली असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. लहानेंनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग झाल्यास आपण सरकारी रुग्णालयांत उपचार घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांपूर्वी सांगितले होते. त्यानुसार कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर फडणवीस हे मुंबईच्या सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात दाखल झाले. डॉ. तात्याराव लहाने आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचार केले जात आहेत

Tags:    

Similar News