जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निवडून येण्यासारखे लोक आमच्याकडे आहेत - संदिप पाटील

Update: 2021-08-29 09:40 GMT

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्षाचे प्रमुख नेते निवडणुकीच्या रणनीतीत लागलेले आहेत. गेल्या वेळेस माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सर्वपक्षीय पॅनल करण्यासाठी पुढाकार घेतलेला होता, त्याचप्रमाणे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्हा बँक सर्वपक्षीय पॅनल करून बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहे. मात्र , काँग्रेसने निवडणुकी संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेतली असता त्यात सर्वांची स्वबळाची इच्छा आहे आणि त्यानुसार काँग्रेसला पोषक वातावरण आहे. असं मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली.

तसेच सोमवारी 30 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली असल्याने त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील आणि रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनाही आमंत्रित केले असल्याने त्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.

चार पक्ष एकत्र आल्यावर जागा वाटपावर कुठेतरी भूमिका घ्यावी लागेल ती घेत असताना योग्य तो न्याय आमच्या पक्षाला मिळावा योग्य वाटा मिळावा अशी अपेक्षा आहे आमच्याकडं लढणारे लोक चांगल्या ताकदी निशी उभे राहणार आहे आणि ते निवडून पण येण्यासारखे आहेत त्यांना संधी मिळावी अशी आमची पक्षाची भूमिका असल्याचे काँग्रेसचे संदीप पाटील यांनी यावेळी सांगितले.

Tags:    

Similar News