…तर दोन दिवसात लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांचा इशारा
…तर दोन दिवसात लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांचा इशारा , नक्की काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी...
आज राज्यात ४७ हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. राज्यात दररोज साधारण ४५ हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात सरकार लॉकडाऊन लावेल अशी चर्चा सध्या सुरु आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी राज्यात उपलब्ध असणाऱ्या आरोग्य यंत्रणेची माहिती जनतेला दिली. तसंच रुग्णवाढीचा वेग असाच राहिला तर आरोग्य यंत्रणांना मर्यादा येऊ शकतात. त्यामुळं राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येत्या दोन दिवसात राज्यात काही तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
"आपल्याला जनतेचा जीव वाचवायचा आहे. मी आजसुद्धा लॉकडाऊनचा इशारा देतोय. मी दोन दिवस परिस्थिती बघेन. सर्व अधिकाऱ्यांकडून आढावा घेईन. राज्यात बदल दिसला नाही तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेण्याबाबतचा इशारा देतो. त्यामुळे आतापासून आपण ठरवूया. आपण ही लाट रोखूच. याशिवाय यापुढची लाटही रोखूया"
असा इशारा देत मुख्यमंत्र्यांनी कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. पाहा काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी
Full View