महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झालाय. सर्वोच्च न्यायालयामधील सुनावणीमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानपरिषदेमधील नियुक्त्या करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळं आता लवकरच राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून या नियुक्त्या होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार झाला. यामध्ये अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळं आता विधानपरिषदेच्या १२ जागांवार कुणाची नियुक्ती होणार, याविषयी उत्सुकता निर्माण झालीय. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी विधानपरिषदेच्या या १२ जागांसंदर्भात निर्णय घेतला नाही. त्यामुळं हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं होतं.