कल्याण कोळशेवाडीत नागरिकांना मिळणार नव्या पाईपलाईनद्वारे पिण्याचे पाणी

कल्याण कोळशेवाडीत नागरिकांना मिळणार नव्या पाईपलाईनद्वारे पिण्याचे पाणी मिळणार आहे.आमदार गणपत गायकवाड यांनी या नव्या पाईपलाईनसाठी 30 लाखाचा निधी मंजूर केला आहे.;

Update: 2021-08-16 05:30 GMT

कल्याण :कल्याण कोळशेवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक वर्षापासून जुन्या पाईपलाईन पाणीपुरवठा होत होता. ही पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.

पिण्याच्या पाण्यासाथी येथील महिलांना मोठी पायपीट करावी लागायची. शाळकरी मुलांचा देखील पाण्यामुळे वेळ वाया जात असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. वारंवार पालिकेला तक्रार देऊन ही पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने स्थानिक नागरिकांनी कल्याण कोळशेवाडी पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे पाईपलाईन बदलण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्वेतील शास्त्रीनगर व आंबेडकर चौकात नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी तीस लाखाचा निधी देण्याचे जाहीर केले.

या नवीन पाईपलाईन टाकण्याचे कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे.यावेळी भाजपचे नगरसेवक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मागील अनेक वर्षापासून पत्रव्यवहार करून, मागणी करून देखील कल्याण कोळशेवाडी परिसरातील या मूलभूत सुविधेकडे कोणी लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता. मात्र, आमदार गायकवाड यांनी नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्याने स्थानिक नागरिकांनी आमदार गायकवाड यांचे आभार मानले.

Tags:    

Similar News