'सरळवास्तू'च्या चंद्रशेखर गुरुजींची निर्घृण हत्या

'सरळवास्तू' च्या माध्यमातून वृत्तवाहीन्यांवर वेगळी ओळख निर्माण करणारे वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची कर्नाटकच्या हुबळीतील एका हॉटेलमध्ये काल दुपारी निर्घृण हत्या करण्यात आली. चंद्रशेखर हे हॉटेलमध्ये भेटीसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.या हत्येनंतर पोलिसांनी सरळवास्तूचे माजी कर्मचारी असलेल्या दोघा आरोपी अटक केलं आहे.;

Update: 2022-07-06 12:45 GMT

 'सरळवास्तू' च्या माध्यमातून वृत्तवाहीन्यांवर वेगळी ओळख निर्माण करणारे वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजींची कर्नाटकच्या हुबळीतील एका हॉटेलमध्ये काल दुपारी निर्घृण हत्या करण्यात आली. चंद्रशेखर हे हॉटेलमध्ये भेटीसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.या हत्येनंतर पोलिसांनी सरळवास्तूचे माजी कर्मचारी असलेल्या दोघा आरोपी अटक केलं आहे.

चंद्रशेखर गुरुजी त्यांच्या खासगी कामासाठी हुबळीला आले होते. दुपारी १२ च्या सुमारास चंद्रशेखर यांची हत्या करण्यात आली. दोन व्यक्ती अनुयायी बनून त्यांच्या भेटीला आल्या होत्या. त्यांनी चंद्रशेखर यांच्यावर हल्ला केला. चंद्रशेखर यांच्यावर हल्ला होत असलेला पाहून हॉटेलमधील काही कर्मचार्‍यांनी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. हल्ला केल्यानंतर दोघेही तिथून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला. वास्तूतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रशेखर आधी कंत्राटदार म्हणून काम करायचे. मग चंद्रशेखर यांनी वास्तूचे काम सुरू केले.

चंद्रशेखर यांच्यावर हल्ला होत असलेला पाहून हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर गुरुजी त्यांच्या खासगी कामासाठी हुबळीला आले होते. चंद्रशेखर यांच्या हत्येमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये हॉटेलच्या रिसेप्शनवर दोन व्यक्ती सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. इतक्यात चंद्रशेखर गुरुजी लॉबीत शिरले आणि त्या दोघांकडे चालत गेले. त्यानंतर, चंद्रशेखर गुरुजी पलंगावर बसतात आणि त्यांच्यापैकी एक गुडघ्यावर वाकतो आणि वास्तु तज्ञांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्याच्या पायाला स्पर्श करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२ च्या सुमारास चंद्रशेखर यांची हत्या करण्यात आली. दोन व्यक्ती अनुयायी बनून त्यांच्या भेटीला आल्या होत्या. त्यांनी चंद्रशेखर यांच्यावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर दोघेही तिथून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोरांना शोधून काढले आहे. आरोपी महन्तेश शिरुर आणि मंजूनाथ मारेवाड हे सरळवास्तूचे माजी कर्मचारी होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर गुरुजी गेल्या चार दिवसांपासून हुबळी येथील हॉटेलमध्ये थांबले होते. मंगळवारी दोन जण त्याला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये आले आणि लॉबीमध्ये बोलावले. चंद्रशेखर गुरुजी लॉबीमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळातच हल्लेखोरांनी त्यांच्यावर अनेक वेळा वार केले आणि तेथून पळ काढला. त्यांना तातडीने KIMS रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

वास्तूतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रशेखर आधी कंत्राटदार म्हणून काम करायचे. त्यानंतर त्यांना मुंबईत नोकरी मिळाली. मग चंद्रशेखर यांनी वास्तूचं काम सुरू केलं. लोकांना वास्तूची माहिती देण्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले. काही वृत्तवाहिन्यांवरदेखील येऊनही ते मार्गदर्शन करायचे.

Tags:    

Similar News