Punjab Election : Punjab Politics TV वर केंद्र सरकारची बंदी

Update: 2022-02-22 11:33 GMT

Photo courtesy : social media

नवीन माहिती तंत्रज्ञान कायद्याचा वापर करत केंद्र सरकारने Punjab Politics Tv वर बंदी घातली आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने Punjab Politics Tv च्या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यासाठी देशाच्या सुरक्षेचे कारण दिले आहे. Sikhs For Justice (SFJ) या संघटनेशी संबंधित हे पोर्टल होते, असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न Punjab Politics TV मार्फत केला जात होता, असा ठपका केंद्र सरकारने ठेवला आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी यासंदर्भातील माहिती दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Punjab Politics TV ची वेबसाईट, एप, सोशल मीडिया अकाऊंट बंद करण्यात आले आहेत. Sikhs For Justice या संघटनेवर UAPA अंतर्गत घालण्यात आली आहे. या संघटनेशी Sikhs पंजाब पॉलिटिक्स टीव्हीचे संबंध होते, त्यामुळे बंदी घालण्यात आल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. नवीन IT कायद्यातील तरतुदीनुसार सरकारला आपत्कालीन परिस्थितीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे.

ही वेबसाईट, एप तसेच सोशल मीडिया अकाऊंटवरील मजकुरामुळे सामाजिक शांततेचा भंग होतो आणि फुटीरतावादाला खतपाणी मिळत असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्याचबरोबर देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा तसेच कायदा सुव्यवस्था असल्याचे सांगत सरकारने ही कारवाई केली आहे. कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांचे Sikhs For Justice (SFJ) या संघटनेशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भाजप आणि काँग्रेसने देखील खलिस्तानवाद्यांशी केजरीवाल यांचे संबंध आहेत, असा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर सरकारची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

Tags:    

Similar News