बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे यांचे निधन

Update: 2024-02-02 08:09 GMT

मुंबई: आपल्या बोल्ड लूक्समुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे यांचे 1 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्या 32 वर्षांच्या होत्या. त्यांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान झाले होते.

पुनम पांडे यांच्या निधनाची बातमी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, "पूनम पांडे यांचे निधन झाल्याची बातमी दुःखी मनाने कळवत आहोत. ती एक उत्तम अभिनेत्री आणि मॉडेल होती. तिला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान झाले होते आणि ती गेल्या काही महिन्यांपासून या आजाराशी लढा देत होती. तिच्या निधनाने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. तिच्या आत्म्याला शांती लाभो आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना."

पूनम पांडे यांच्या निधनाबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. काही लोक म्हणत आहेत की तिने आत्महत्या केली, तर काही लोक म्हणत आहेत की तिला हृदयविकाराचा झटका आला. मात्र, पूनम पांडे यांच्या निधनाचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही.

Tags:    

Similar News