देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण...

Update: 2020-10-24 09:03 GMT

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करुन माहिती दिली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना ची टेस्ट करुन घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.

काय म्हटलंय फडणवीस यांनी?

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.


Tags:    

Similar News