औरंगाबादेत भाजपकडून मालिकांचा पुतळा जाळला

Update: 2021-11-10 09:45 GMT

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपावरून आता भाजप आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये बुधवारी भाजपकडून निदर्शने करत मलिक यांच्या पुतळा जाळण्यात आला.

शहरातील क्रांती चौकात भाजपकडून निदर्शने करत मलिक यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी मलिक यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.' या भंगारवाल्या मालिकांच करायचं काय,खाली मुंडक वरती पाय' आशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.तसेच मलिक यांचा पुतळा जाळण्यात आला आहे.

फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केले होते. त्यांनतर मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा पलटवार फडणवीस यांनी केला होता.त्यानंतरच आता भाजपकडून मलिक यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येत आहे.

Tags:    

Similar News