शाळेत जायला जीवघेणा रस्ता; पालकांनी काढले शाळेतून दाखले

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माळेगांव पठार गावाअंतर्गत असणा-या धादवडवाडी परीसरातील रामेश्वरदरा येथील विद्यार्थ्यांना शाळेत जायला यायला लागणारा रस्ताच जीवघेणा असल्याने रस्त्याअभावी पालकांनी विद्यार्थ्यांचे दाखलेच शाळेतून काढून आणले आहेत.;

Update: 2022-06-08 17:36 GMT

एकीकडे विकासाच्या गप्पा होत असताना निवारा, रस्ते, विज ,पाणी या मूलभूत सुविधांचा शासन प्राधान्य देत आहे. मात्र स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतरही रामेश्वर दरा मात्र विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

येथील स्थानिकांनी दिवसभर मोल मजूरी करुन संध्याकाळी घरी आल्यानंतर आपल्या मुलांना शाळेत व्यवस्थीत ये-जा करण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून लोकसहभागातून रस्ता तयार केला.अनेक वर्ष मुले ह्याच रस्त्याचा वापर करतात. मात्र प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या रस्त्याची दयनीय अवस्था होऊन चालणेही कठीण होत असते.

स्थानिक लोकही किती वेळा स्वखर्चाने हा रस्ता दुरूस्त करणार या प्रश्नासह हा रस्ता वनविभाग हद्दीतून असल्याने या रस्त्याचा तीन दोनचा प्रस्ताव तयार करुन मंजुरी मिळवली मात्र तरीही ना स्थानिक लोकप्रतिनिधी ,ना.सरपंच ,ना पंचायत समिती सदस्य,ना जिल्हा परिषद सदस्य,ना आमदार,ना खाजदार या रस्त्याकडे लक्ष देत आहे.निवडणुका आल्या की हे राजकीय मंडळी मतांचा जोगवा मागण्यासाठी रात्री अपरात्री रस्ता शोधत शोधत आमचे घरी येतात. मात्र निवडणुका झाल्या की हे सर्व विसरुन जातात असा संतप्त सवाल साईनाथ धादवड यांनी केला आहे.

अखेर वैतागलेल्या स्थानिकांनी आपली मुलांचे दाखले शाळेतून काढून घेतले व ह्या मुलांचे दुसऱ्या गावातील शाळेत नावे दाखल करणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Tags:    

Similar News