दारु, साडीपे बिक जाओंगे तो ऐसा रस्ता पाओंगे! ; आपचे अनोखे आंदोलन

कल्याण – टिटवाळ्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्याने आपने महापालिकेच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं आहे.;

Update: 2021-08-07 10:55 GMT

कल्याण : कल्याण – टिटवाळ्याला जोडणारा मुख्य रस्ता सध्या खड्डेमय झाला आहे. या रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली असून, टिटवाळा परिसरातील नागरिकांना या खड्ड्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.

रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कल्याण टिटवाळा रोडवरील बल्यानी चौकात एक अनोखं आंदोलन केलं. आपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दारू पे बीक जाओंगे तो ऐसा रस्ता पाओंगे, साडी पे बिक जाओंगे तो ऐसा रस्ता पाओंगे अशा घोषणा देत आंदोलन केलं.

या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असल्याने येथे छोटे- मोठे अपघात होत असतात. पावसाचे पाणी या खड्ड्यात साचत असल्याने खड्डा लक्षात येत नसल्याने दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. सोबतच या रस्त्यामुळे महिला आणि वयोवृध्द नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

त्यामुळे केडीएमसीकडून तातडीने या रस्त्याची डागडूजी हाती घेण्यात यावी अन्यथा महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात अशाप्रकारे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आप आंदोलकांनी दिला आहे.

तर याबाबत स्थानिक माजी नगरसेवक मयुर पाटील यांनी कल्याण रस्त्यासाठी निधी पालिकेकडे असून पालिकेला वारंवार पत्र देऊन सुद्धा पालिका काम करत नसल्याचा आरोप केला आहे

Tags:    

Similar News