जळगावमध्ये सैराट, आंतरजातीय विवाह केलेल्या गरोदर मुलीवर कुटुंबियांचा हल्ला

Update: 2021-03-19 14:29 GMT

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून वडिल आणि भावाने गरोदर मुलीवर आणि जावयावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलगी व जावई गंभीर जखमी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी गावात घडली आहे. मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा रागातून मुलीचे वडील व भावाने गरोदर असलेल्या जया ठाकरे व जावई दिनेश ठाकरे यांच्यावर विळ्याने आणि हातोडीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 





दिनेश अरुण ठाकरे व जया दिनेश ठाकरे या दोघांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आंतरजातीय विवाह केला होता. विवाहांनंतर दोघे जवळपास वर्षभर दुसऱ्या गावात राहत होते. त्यानंतर महिन्याभरापूर्वी दोघेही वर्डी गावात परतले होते. पण मुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून लीचे वडील संतोष पाटील आणि भाऊ सुनील पाटील या दोघांनी जावई दिनेश ठाकरे यांना गावाबाहेर एकटे गाठून विळ्याने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर दिनेशच्या घरी जाऊन दिनेशची पत्नी म्हणजेच मुलगी जयावर देखील वडील व भावाने विळा व हातोडीने हल्ला केला. जयाच्या हाताची बोटे कापले गेली आहेत. जया ठाकरे ही गरोदर असल्याने तिची प्रकृती जास्तच गंभीर आहे. या दोघांवर जळगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Tags:    

Similar News