पिंपरी चिंचवड येथील विविध विकास कामांसाठी 43 कोटी 98 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑनलाईन झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकास कामांसाठी येणाऱ्या 43 कोटी 98 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.
प्रभाग क्रमांक 23 मधील हेडगेवार पुल ते कुणाल रेसीडेन्सी पर्यंत जाणारा 12 मीटर रुंद रस्ता विकसीत करण्याकामी येणाऱ्या 44 लाख 20 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
तर प्रभाग क्रमांक 27 रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारणे आणि अनुषंगीक कामे करण्याकामी येणाऱ्या 1 कोटी 92 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी किमान वेतन कायदयानुसार 36 कामगार व 2 सुपरवायझर यांचे तीन महिने कालावधीकरीता 29 लाख 47 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. त्याच सोबत औषधे आणि साहित्यांच्या खरेदीसाठी 45 लाख 1 हजार , कै.अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथील जंबो कोविड रुग्णालयातील 140 बेड आणि इतर बेड सुरु ठेवणेसाठी 1 कोटी 42 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
टाटा मोटर्स रस्ता भोसरी ते थरमॅक्स चौक रस्ता सुशोभिकरणासाठी 1 कोटी 22 , क आणि ई क्षेत्रिय कार्यालयातील दुभाजक सुशोभिकरणासाठी 71 लाख 77 , वैद्यकीय विभागाचे वापराकरीता ब्लड मोबाईल कलेक्शन व्हॅनचे मनपा स्पेसीफिकेशनप्रमाणे चॅसी खरेदी करण्यासाठी येणा-या 37 लाख 10 हजार अधिक सेवाकर इतक्या खर्चास मान्यता देण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.