शाहूनगर पोलीस ठाणे इथं कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल हनुमंत कुलकर्णी यांचा कोरोनामुळे आज पहाटे मृत्यू झाला. काही दिवसांपासून ते ताप आणि सर्दी यामुळे आजारी होते आणि घरीच होते.
१३ मे रोजी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. काल रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आज सकाळी ते रुग्णालयात दाखल होणार होते. मात्र, आज पहाटे राहत्या घरी बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना सायन रुग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आलं तिथं डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं.