अमेरिकन प्रवक्ता बोलली अस्खलित हिंदी, ट्विटरवर लोक म्हणाले जान भी देंगे इसके लिए

दिल्लीत भारताच्या अध्यक्षतेखाली G-20 शिखर परिषद सुरु आहे. त्यासाठी जगभरातील G-20 देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री दिल्लीत आले आहेत. त्यापार्श्वभुमीवर जो बायडन आणि पंतप्रधान मोदी यांची भेट झाल्यानंतर अमेरिकन प्रवक्ता मार्गारेट मॅकलिओड यांनी दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती दिली. यावेळी मार्गारेट अस्खलित हिंदीत बोलताना दिसून आल्या. मात्र त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

Update: 2023-09-09 13:18 GMT

अमेरिकन स्टेटच्या प्रवक्ता मार्गारेट मॅकलिओड यांनी मोदी-बायडन यांच्या चर्चेची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. यावेळी मार्गारेट मॅकलिओड अस्खलित हिंदी बोलताना दिसून आली. त्यानंतर अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत मार्गारेट मॅकलिओड यांचे कौतूक केले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला अनेकांनी मार्गारेटची हिंदी पाहून अनेक पुरुषांनी जान भी देंगे तेरे लिए, अशा प्रकारच्या कमेंट केल्या आहेत.

@therohitmaan या ट्विटर वापरकर्त्याने एएनआय च्या ट्वीटला रिप्लाय देतांना म्हटले आहे की, जान भी दे देंगे इसके लिए

@Yaadav_ ने ट्वीट करून म्हटलं आहे की, ओके बॉईज, सब लोक अपने भाभी को नमस्ते बोलो और पैरी पोना करलो...

ट्रिगर मास्टर या ट्वीटर वापरकर्त्याने मॅरिड बॉईज कमेंट असं म्हणत मैं बर्बाद होना चाहता हूँ अशा आशयाची मीम्स ट्वीट केली आहे.

pt async src="https://platform.twitter.com/widgets.js" data-charset="utf-8">

@alone_Smuggler याने मीम्स ट्वीट करून म्हटलं आहे की, मस्त माल है...

@tiwari_G_eek ने अमित शहा यांचा फोटो ट्वीट करून त्यावर हम जान भी देंगे इसके लिए, आप क्या बात कर रही हो, असं म्हटलं आहे.

@Manikantku40607 यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, पोपटलाल – भिडे मेरी शादी इससे सेट करा दे...

@NehruTheOGBoss या ट्विटर वापरकर्त्याने ट्वीट करून म्हटले आहे की, इस सुंदरी ने तो मेरा मन मोह लिया

राघव मासूम यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, कितनी प्यारी हिंदी बोल रही है ये गोरी मेम

मार्गारेट मॅकलिओड यांच्या व्हिडीओवरच्या प्रतिक्रीया पाहिल्यानंतर ही मानसिकता का तयार होते? यासंदर्भात प्रा. खिल्लारे यांच्याकडून जाणून घेतले. यावेळी त्यांनी सांगितलं की, सोशल मीडियावर वावरताना आपल्याला कुणी पाहत नाही. आपण सेफ आहोत. कुणी काही बोलणार नाही आणि काही कारवाईही होणार नाही. त्यामुळे अशा प्रकारची मानसिकता तयार होते, असं मत प्राध्यापक खिल्लारे यांनी व्यक्त केले.

Tags:    

Similar News