ब्लकमेल करत तरुणीवर दीड वर्ष ७ जणांचा अत्याचार, पीडितेची आत्महत्या

मैत्रीचा गैररफायदा घेत एका तरुणाने तरुणीचा व्हिडिओ तयार केला आणि त्यातून ब्लॅकमेलिंग करत तिच्यावर ७ जणांनी तब्बल दीड वर्ष अत्याचार केले. यामध्ये एका तरुणीनीहे त्या नराधमांना मदत केल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.;

Update: 2022-06-16 10:31 GMT

कल्याणमध्ये एका तरुणीने लैंगिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मित्रासोबतच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्या तरुणीवर गेल्या दीड वर्षांपासून ७ तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या इमारतीच्या गच्चीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींना एका मुलीनेच मदत केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना तपासात मृत तरुणीच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट मिळाली आहे. यानुसार कोळसेवाडी पोलिसांनी ०८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका तरुणीचा देखील समावेश आहे. ही आरोपी तरुणी हे गैरकृत्य करण्यासाठी या ७ तरुणांना नेहमी मदत करत होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

"आरोपींमध्ये कल्याण पूर्वेमधील एका नामांकित बिल्डरची मुलं असून आमच्यावर दबाव टाकला जात आहे. आमच्या जीवाला धोका असून आरोपींवर कठोरातुन-कठोर कारवाई करावी" अशी मागणी मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केली आहे. कल्याण पूर्व परिसरात या तरुणीने राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती.

या पीडित तरुणीचा नुकताच बारावीचा निकाल लागला होता. बारावीच्या परीक्षेत तिला ७१%टक्के पडले आहेत. तपासादरम्यान मयत तरुणीच्या मोबाईलमध्ये पोलिसांना एक सुसाईड नोट आढळुन आली. या सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मयत तरुणीला याच परिसरात राहणारे ०७ तरुण व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर गेल्या दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार करत होते. धक्कादायक बाब म्हणजे या-०७-विकृत नराधमांना

तरुणी हे गैरकृत्य करण्यासाठी मदत करत होती. ही तरुणी पिडीतेची मैत्रीण होती. दरम्यान अटक आरोपी मधील काही कल्याण मधील धनदांडग्या विकासक-बिल्डर्सची मुलं असल्याचे समजते. याबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी "आमच्या मुलीवर बलात्कार झाला आहे आणि तिला गच्चीवरुन ढकललं की तिने आत्महत्या केली याचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी केली आहे.

Tags:    

Similar News