3 लाख कर्ज मंजूर झाले आणि २५ कोटींची लॉटरी लागली

Update: 2022-09-19 05:32 GMT

तुम्ही ३ लाखांच्या कर्जासाठी बँकेत चकरा मारत आहात, खूप प्रयत्नांनी कर्ज मंजूर झाले आणि त्याचवेळी तुम्हाला २५ कोटींची लॉटली लागली तर? एखादे स्वप्न वाटले ना...पण स्वप्नवत वाटण्यासारखी ही गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे. केरळमध्ये एका व्यक्तीला ओणम स्पेशल बंपर लॉटरी लागली आहे.


केरळातील तिरुवनंतपूरम मध्ये अनुप या रिक्षाचालकाला ही लॉटरी लागली आहे. अनुप हे आधी शेफ म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांनी रिक्षा चालवायला सुरूवात केली. पण त्यांना शेफ म्हणून मलेशियाला जायचे होते. त्यासाठी कर्ज मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. त्यांनी बँकेत कर्जासाठी अर्ज केला. या दरम्यान ओणम निमित्त केरळ सरकारने २५ कोटींचे पहिले बक्षीस असलेली लॉटरी जाहीर केली होती. त्यात अनुप यांना शनिवारी लॉटरीचे तिकीट खऱेदी केले होते. या दरम्यान अनुप यांचे कर्ज मंजूर झाल्याचे त्यांना समजले. पण लगचेच २५ कोटींची लॉटरी लागल्याचे जाहीर झाले आणि अनुप यांना आश्चर्याचा धक्काच बसला.


अनुप यांना या २५ कोटींच्या लॉटरीपैकी टॅक्स वजा करुन १५ कोटी ७५ लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे आता अनुप यांनी मलेशियाला जाण्याचा प्लान रद्द केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.

Tags:    

Similar News