एसटी संपाचा विद्यार्थ्यांना फटका, उशीर झाल्याने परीक्षेसाठी प्रवेश नाकारला

Update: 2021-11-22 08:32 GMT

राज्यातील आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचा गोंधळ ताजा असतान आता आणखी एक प्रकार पुणे येथे घडला आहे. स्पर्धा परीक्षांचा गोंधळ कधी संपणार असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे. सोमवारी स्टाफ सिलेक्शनचा पेपर देण्याकरीता राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य विद्यार्थी पुण्यामध्ये दाखल झाले होते. मात्र यामधील अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश न मिळाल्याने हे विद्यार्थी संकटात सापडले आहेत.

हे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले पण त्यांना उशीर झाला असल्याचे सांगत परीक्षा केंद्रांवर प्रवेश नाकारण्यात आला आहे. यामुळे 50 पेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत, संपूर्ण राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे हे विद्यार्थी खाजगी वाहनांनी प्रवास करून पुण्यामध्ये दाखल झाले होते. मात्र या परीक्षार्थींना परीक्षेकरिता प्रवेश न मिळाल्याने अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

Tags:    

Similar News