नांदेडच्या कंधार तलावात बुडून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Update: 2022-08-21 12:57 GMT

नांदेड मध्ये तलावात बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाचही तरुण हे हाजी सय्या  दर्जा येथे दर्शनासाठी गेले होते.

जिल्ह्यातील कंधार येथील प्रसिद्ध जगतुंग तलावात  बुडून नांदेड येथील पाच जणांचा मृत्यू झालाय. 

पाचही तरुण कंधार येथील हाजीसय्या दर्गा येथे दर्शनासाठी गेले होते.. विशेष म्हणजे हे पाचही जण एकाच कुटूंबातील होते.. 

मोहम्मद विखार, मोहम्मद साद, सय्यद सोहेल, सय्यद नाविद आणि मोहम्मद आफ्रिदी अशी मयतांची नावे आहेत..

यातील दोघे सख्खे भाऊ तर अन्य तीन जण चुलते आहेत. शहरातील खुदबईनगर येथील रहिवासी होते. 

 त्या पाच जणांनी हाजीसय्या दर्गा दर्शनानंतर ते जगतुंग तलावाशेजारी बसून जेवण केलं. त्यानंतर तलावात हात धुण्यासाठी गेलेला तरुणाचा तोल गेला. त्याच्या बचावासाठी चौघांनी तलावात उडी घेतली. मात्र त्यांना यश आलं नाही.. यात पाचही जणांचा मृत्यू झालाय.

Tags:    

Similar News