एखाद्या निरोगी व्यक्तीची कॅन्सर शोधण्यासाठी तपासणी करणे म्हणजेच कॅन्सरची स्क्रिनिंग करणे होय. कॅन्सर स्क्रिनिंगचे उदिष्ट केवळ सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सर शोधणे किवां जास्तीतजास्त कॅन्सरचे रुग्ण शोधणे हे नसून कॅन्सरमुळे होणारा त्रास उपचार करून कमी करणे तसेच रुग्णाचे आयुष्य वाढवणे हे आहे.
कॅन्सर स्क्रिनिंगचे धोके काय आहेत?
कॅन्सर स्क्रिनिंगमध्ये बऱ्याच निरोगी लोकांना नाहक तपासणीस समोर जावे लागते. तसेच तपासणी संबधी दुष्परिणाम, मानसिक त्रास सहन करावा लागतो. बऱ्याच वेळा स्क्रीनिंगमुळे जो रोग भविष्यात कधीही वाढणार नसतो असा रोग देखील शोधला जाऊन त्याचा उपचार देखील केला जावू शकतो. ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये overdiagnosis आणि overtreament असे संबोधले जाते. आपल्या देशाच्या लोकसंख्याचा विचार करता कॅन्सर स्क्रिनिंग फार खर्चिक असून त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आणि मनुष्यबळाची गरज आहे. कॅन्सर स्क्रिनिंगसाठी हळूहळू वाढणारे रोगच निवडले जातात. ज्यामध्ये उपचार करून रोग बरा होतो. तसेच स्क्रिनिंगसाठीच्या चाचण्या देखील सध्या, कमी खर्चिक व रूग्णांना कमीत कमी त्रास होणाऱ्या वापरल्या जातात. पण, सर्वच लोकांची स्क्रीनिंग न करता high risk व्यक्तींची तपासणी केली जाते.
Follow @MaxMaharashtra
कोणत्या तपासण्या करतात?
हिस्ट्री तसेच शारीरिक तपासणी, रक्त तपासणी, छातीचा एक्स-रे, माम्मोग्राफी, सोनोग्राफी, इंडोस्कोपी व पाप्स्मेअर इत्यादी तपासण्या कॅन्सर स्क्रिनिंगसाठी वापरल्या जातात.
विविध कॅन्सर आणि स्क्रिनिंग तपासण्या
- छातीचा (Breast) कॅन्सर: २० वर्ष पासून ३९ वर्षापर्यंत सर्व स्त्रिया स्वत: छाती तपासू शकतात किंवा दर ३ वर्षांनी दवाखान्यात जाऊन छाती तपासू शकतात. ४० वर्ष पासून पुढे दरवर्षी माम्मोग्रफी करावी.
- सर्वायकल (Cervical) कॅन्सर: २१ वर्ष किंवा शारिरीक संबंध ठेवल्यापासून ते ६५ वर्षापर्यंत सर्व स्त्रियानी दर ३ वर्षांनी pap टेस्टींग (cytology) करावी.
- कोलोरेक्टाल (Colorectal) कॅन्सर: २१ वर्ष किंवा अधीक वय असल्यास दरवर्षी स्टूल occult blood test, ५वर्षांनी sigmoidoscopy, १० वर्षांनी colonoscopy.
- प्रोस्टेट (Prostate)कॅन्सर: ५० वर्षा पासून पुढे दर वर्षी DRE व रक्ताची PSA तपासणी करावी.
- लंग (Lung) कॅन्सर: ५५ ते ७४ वर्ष वयोमान असणाऱ्यांनी व जे दर वर्षी ३० पाकीट सिगारेट ओढतात त्यांनी एक्स्पर्ट डॉक्टरकडून तपासणी व गरज लागल्यास सी. टी. स्कॅन करावा.
- हेड आणि नेक (Head & Neck) कॅन्सर: तंबाकू, मावा, गुठका, खैनी, बिडी, सिगारेट खाणाऱ्या व्यक्ती, ४० वर्ष पासून पुढे दर वर्षी एक्स्पर्ट डॉक्टरकडून तपासणी करावी.
अनुवंशिक कॅन्सरसाठी जेनेटिक तपासणी केव्हा करावी?
- कमी वयात कॅन्सर आढळल्यास
- कुटुंबात एकापेक्षा जास्त जणांना एकच कॅन्सर असणे
- एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त वेगवेगळे कॅन्सर असणे
- एकापेक्षा जास्त कॅन्सर एकाच व्यक्तीला असणे
- पाथोलॉजी रिपोर्टमध्ये जेनेटिक कॅन्सर सिंड्रोम येणे
डॉ. दिलीप निकम,
विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.
कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई
docnik128@yahoo.com