गेल्या चोवीस तासात ५७,०७४ नवीन रुग्णाचं निदान; तर मृतांचा आकडाही २२२ पार

देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या महाराष्ट्राला गेली दोन दिवस लॉकडाऊनची चर्चा असताना विकेंड लॉकडाऊन जारी केला असताना आज पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने उसळी घेतली आहे.चोवीस तासात ५७,०७४ नव्या रुग्णांची नोंद, तर मृतांचा आकडाही 222 पार पुन्हा चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.;

Update: 2021-04-04 16:50 GMT

आज दिवसभरात राज्यात तब्बल ५७,०७४ नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर आज मृतांचा आकडासुद्धा वाढून राज्यात तब्बल 222 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.8 टक्के असून मृत्यूदर 1.87 टक्क्यांवर पोहोचलाय. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत २५,२२,८२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज 57,074 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 27,508 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 25,22,823 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.8% झाले आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


मुंबईला कोरोनाचा विळखा

मुंबई जिल्ह्यात बाधितांचा आकडा 4,30,503 वर पोहोचला आहे. मुंबईत एकूण 3,73,113 रुग्ण बरे झाले असून येथे आतापर्यंत 11,779 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई जिल्ह्यात सध्या 66,803 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे.ठाण्यात आतापर्यंत 6,126 जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातसुद्धा कोरोना रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. येथे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास प्रशासनाला यश येत नाहीये. ठाण्यात बाधितांचा आकडा 3,61,654 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत येथे 3,02,267 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत 6,126 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून सध्या येथे 53,230 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पुण्यात तब्बल 5,56,758 रुग्णांवर उपचार सुरु असून पुणे जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती तर अतिशय विदारक आहे. येथे सध्या 81,317 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 8,437 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात बाधितांचा आकडा 5,76,758 वर पोहोचला असून येथे आतापर्यंत 4,86,958 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबई शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला

मुंबई शहरात आज दिवसभरात 11,206 संशयितांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तर आज दिवसभरात मुंबईत 25 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 4,52,681 वर पोहोचला आहे. मुंबई जिल्हा क्षेत्रात आतापर्यंत 3,73,113 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

टास्कफोर्सच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीमध्ये राज्यव्यापी लॉकडाऊनडच्या तयारीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. परंतु आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकेंड लॉकडाउन चा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरसकट लॉकडाऊन ऐवजी कडक लॉकडाऊन असावा अशी अपेक्षा मोठ्या संख्येने राजकीय पक्ष आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे त्यामुळे राज्य सरकार देखील आता संभ्रमावस्थेत आहे.

सरसकट लॉकडाउन करण्यापेक्षा गर्दीचे ठिकाण नियंत्रित करण्यासाठी कडक उपाययोजना करण्यावर राज्य सरकारचा यापुढील काळात भर असणार आहे. त्यामुळेच राज्यभर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी ठाकरे सरकार आगामी काळात कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags:    

Similar News