ऑनलाईन वेश्या व्यवसाय वाढला...!

का वाढला ऑनलाईन वेश्या व्यवसाय? Online Sex Work increase in Lockdown Police online sex racket exposed by Noida police

Update: 2021-06-20 11:09 GMT

लॉकडाउनमध्ये ऑनलाइन पद्धतीने जग विस्तारत आहे. परंतू त्याचा वापर आणि गैरवापर या दोन्ही गोष्टी समोर येत आहेत. या लॉकडाउन दरम्यान, वेश्या व्यवसाय ( online Sex Worker) सुद्धा ऑनलाइन पद्धतीने सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान ऑनलाइन वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका टोळीला नोयडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

वेश्या व्यवसायाचा (Online Sex Worker) धंदा करणाऱ्या दोन मुली तसेच दोन आरोपींना अटक करण्यात आली असून माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, शनिवारी १९ जून रोजी नोयडाच्या सेक्टर - ५६ मधील एका गेस्ट हाऊस मधून पोलीस इंचार्ज अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटच्या नेतृत्वात एएचटीयूच्या पोलिसांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका टोळीला पकडले आहे. तसेच वेश्या व्यवसायातील 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ऑनलाईन वेश्या व्यवसाय (Online Sex Worker) दोन आरोपींपैकी एक नेपाळ मधील रहिवासी बुद्धिमान लामा तर दुसरा पंजाबमधील रहिवासी मोनू असल्याचं समोर आलं आहे. हे दोनही आरोपी दिल्लीमधून टोळी चालवत होते. पोलिसांनी आरोपींकडून आय-१० कार, तीन मोबाइल आणि २५ हजार रुपये रोख रक्कम जप्त केली आहेत. चौकशी केली असता टोळीमध्ये सहभागी असलेला एक आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याचं समजतंय. दरम्यान त्याचा शोध घेतला जात असून आरोपींविरोधात सेक्टर ५८ मधील पोलिस स्टेशनच्या संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास करणार्‍या नोयडा पोलिसांच्या डीसीपी वृंदा शुक्ला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वेश्या व्यवसायाबरोबरच (SexWork) मानवी तस्करीचा सुद्धा आम्ही तपास करणार आहोत. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या दोन मुलींपैकी एक मुलगी नेपाळची आणि दुसरी पश्चिम बंगालची असल्याची माहिती वृंदा शुक्ला यांनी दिली. हा मानव तस्करीचा प्रकार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

डीसीपी वृंदा शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी पोलिसांना माहिती मिळाली होती की, ऑनलाइन बुकिंगद्वारे एक टोळी महिलांचा वेश्या व्यवसाय चालवत आहे. (online Sex Racket) तक्रार करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना एक ईमेल आयडीदेखील शेअर केला होता, तसेच सर्व डील्स व्हॉट्सअ‍ॅपवरच केल्या जात असल्याचं सांगितलं. त्यांनतर मुलींना त्या-त्या ठिकाणी पाठवलं जात असे.

पोलिसांनी सापळा रचत १९ जून रोजी टोळीसोबत डील पक्की केली. पोलिसांच्या टीम मधील सदस्यांनी ग्राहक बनून टोळीतील सदस्यांशी बातचीत केली. डीलनुसार १९ जूनला दोन व्यक्ती मुलींना सोडण्यासाठी ठरलेल्या ठिकाणावर आले असता पोलिसांनी त्यांना पकडले.

कसा चालतो ऑनलाईन वेश्या व्यवसाय? ( online Sex Work)

डीसीपी वृंदा शुक्ला यांनी संगितले की, वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीचे सदस्य ५ हजार ते 20 हजार इतकी रक्कम ग्राहकांकडून घेत असत. ज्यातून १५०० रुपये मुलींना देऊन बाकीचे पैसे टोळीतील सदस्य ठेवायचे. डील झाल्यानंतर हॉटेल, घर किंवा रूमची व्यवस्था ग्राहकांद्वारेच केली जायची, टोळीतील आरोपी मुलींना फक्त तिथे सोडायचं काम करायचे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक नोकऱ्या तसेच व्यवसाय सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. अशात वेश्या व्यवसाय सुद्धा ऑनलाईन पद्धतीने सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. कोरोना काळातील ही पहिली घटना नसून, देशभरातून बऱ्याच ठिकाणाहून अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. अलीकडेच यूपी मधील एक प्रकरण चांगलाच गाजलं होतं, ज्यामध्ये बाहेरून बोलावलेल्या कॉलगर्लचा (Call girl) मृत्यू झाला होता.

Tags:    

Similar News