आजच्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण क्रमांक दोनला आहे. त्यातच आज निवडणुक आयोगातही महत्वाचा दिवस आहे. राज्यात शिंदे – फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून सुप्रीम कोर्टात ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. आज मसुप्रीम कोर्टात १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे राज्यासहीत देशाचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश वाय. एस. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर आजची सुनावणी होईल. या सत्तासंघर्षाची सुनावणी अनेकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आज सुप्रीम कोर्ट नेमके कोणते निर्देश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…