मुंबई जलमय...

मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून संततधार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. कुर्ला, दादर परिसरात जोरदार पाऊस आहे.जोरदार पावसामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची सेवा बंद झाली आहे.पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी रेल्वे सेवा प्रभावित झाली असून मध्य रेल्वेच्या चूनाभट्टी रेल्वे स्टेशन वर पाणी साचल्यामुळे लोकल ट्रेन जागच्याजागी थांबले आहेत.

Update: 2021-07-16 02:58 GMT

अतिवृष्टीमुळे मुंबईची लाईफ लाईन स्लो

मुंबई शहरात अतिवृष्टी झाल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले असून कुर्ला विद्याविहार परिसरातील स्लो लाईन वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत आहे. धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर सुरू करण्यात आली असून मध्य आणि हार्बर रेल्वे वीस ते पंचवीस मिनिटांनी उशिरा धावत आहे ट्रान्स हार्बर लाईन व्यवस्थित सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/ShivajiIRTS/status/1415865508813893632?s=08

सायनचे गांधीमार्केट जलमय झाले आहे. तसेच सायनमध्ये पाणी साचले आहे. पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागतेय. वडाळा परिसरातही पाणी साचले आहे. सध्या तरी वाहतूक सुरू आहे. मात्र पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

महाराष्ट्रात दोन दिवसापासून पावासाला पुन्हा सुरुवात आहे. भारतीय हवामान विभागानं राज्यातील पुढील चार दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जारी केला आहे. 17 जुलैपर्यंत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाच्या अंदाजासाठी भारतीय हवामान विभागाचे अपडेटस पाहावेत, असं आवाहन हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं राज्यात 17 जुलैपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं देखील हवामान विभागामार्फत कळवण्यात आलं आहे.१


16 जुलैला पावसाचा काय अंदाज

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर सातारा,पुणे, ठाणे, पालघर, मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, चंद्रपूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार वगळता इतर सर्व जिल्ह्यात पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

17 जुलै रोजी पावसाची काय स्थिती?

हवामान विभागानं 17 जुलै रोजी राज्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे तर सातारा, कोल्हापूर आणि रायगडला येलो अ‌ॅलर्ट दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/3627017804189019/

Tags:    

Similar News