ठाणे जिल्ह्यातील भयाण वास्तव ; रस्त्याअभावी 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू
एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे एका गरोदर मातेला रस्त्या अभावी वेळेत उपचार न मिळाल्याने 9 महिन्याच्या बाळाचा दुर्दवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडली आहे.
एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे एका गरोदर मातेला रस्त्या अभावी वेळेत उपचार न मिळाल्याने 9 महिन्याच्या बाळाचा दुर्दवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात घडली आहे परंतु हा व्यवस्थेने बळी घेतला असल्याचा आरोप काँग्रेसचे अनंता वनगा यांनी केला असून सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना केली आहे
ठाणे जिल्हातील भिवंडी तालुक्यातील दिघाशी ग्रामपंचायत मधील आदिवासी बहुल असलेल्या धर्मीपाडा येथील दर्शना महादू फरले (वय 32 वर्ष) या गरोदर मातेला दि 1-9-2022 रोजी सकाळी 9:00 वाजता प्रसूतीच्या कळा सुरु झाल्या परंतु रस्त्याची सोय नसल्याने तिला तिच्या नाईवाईकांनी डोली करून एक किलोमीटरची पायपीट करत दिघाशीच्या मुख्य रस्त्यावर पोहचवले परंतु रस्त्या अभावी वेळेत दवाखाण्यात पोहचवता आले नसल्याने रस्त्यातच तिची प्रसूती झाली व दिघाशी प्राथमिक आरोग्य केद्रात पोहचण्या आधीच त्या बालकांचा मृत्यू झाला.
त्या मातेवर वजरेश्वरी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत परंतु घटना घटना घडल्या नंतर दोन दिवसांचा कालावधी उलटूनही अद्यापही घटनास्थळी ना प्रशासन पोहचले ना अधिकारी 25घरांची वस्ती असलेल्या या आदिवासी पाड्यावर रस्ता पाणी वीज अश्या कोणत्याच मूलभूत सुविधा पोहचलेल्या नसून आजही आजही येथील आदिवासींना सोयीसुविधा अभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत या घटनेची माहिती मिळताच पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव अनंता वनगा तालुका सेवादल अध्यक्ष जगदीश केणे,आदिवासी सेल वाडा तालुका अध्यक्ष बाळा लहांगे यांनी या धर्मी पाडा येथे भेट देऊन सांत्वन केले व कारवाईची मागणी केली आहे.