'ए-कंपनी' वर वरदहस्त कुणाचा? टीएमसी खासदार महुआ मोईत्रा लोकसभेत गरजल्या
बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) "सायलेंट ऑपरेटर" का आहे? आणि चौकशी अहवाल पूर्ण न करता नुकताच एफपीओ (FPO) मंजूर का झाला? SEBI ने "Mr A's" च्या मुलाच्या सासऱ्यांना इनसाइडर ट्रेडिंग आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या समितीमध्ये कसे बसू दिले? देशाची प्रतिष्ठा आणि स्थिरता धोक्यात आणणाऱ्या अदानी घोटाळ्याची सर्व प्रकरणांची "संपूर्ण, पूर्ण आणि सखोल" चौकशीची मागणी खा.महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत केली.