राज्यात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आज राज्यात कोरोनाचे १३ हजार ६५९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ५४ करोना बाधित रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आज ९,९१३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २०,९९,२०७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.२१% एवढे झाले आहे. तर राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर २.३४ % इतका आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७१,१५,५३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,५२,०५७ (१३.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ४,७१,१८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
काय आहे राज्यातील एकंदरित परिस्थिती?