sushant singh rajput case: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया!

Update: 2020-08-20 06:00 GMT

सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput)च्या मृत्यूनंतर ज्या पद्धतीने राजकीय पक्ष, मीडिया, सरकारी यंत्रणा, पोलीस यंत्रणा, न्यायपालिका वेगाने तपास करत आहेत. त्याच वेगाने नरेंद्र दाभोळकर (narendra dabholkar )यांच्या खुन्य़ांचा तपास का होत नाही? असा सवाल उपस्थित होत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार य़ांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा...

कोरोना रुग्णांची माहिती RSSला दिल्याचा आरोप, मानवी हक्कांच्या उल्लंघनाची तक्रार

दाभोळकरांच्या हत्येच्या सूत्रधारांना अटक कधी होणार?- मुक्ता दाभोळकर

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश, आजपासून राज्यांतर्गत बससेवा

बुधवारी सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे CBI सोपवावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. यावरच पवारांनी महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करुन चौकशीत पूर्ण सहकार्य करेल. मात्र, या प्रकरणाची गत २०१४ मध्ये सीबीआयकडे देण्यात आलेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणाच्या तपासाप्रमाणे होऊ नये.

अशी खोचक टिप्पणी केली आहे.

 

आज डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 7 वर्षे पूर्ण झाली. हाच धागा पकडत पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पवारांच्या या टिप्पणी नंतर भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येतात. हे पाहणं महत्वाचं आहे.

Similar News