रेल्वे रिक्रूटमेंट सेल (rrc)ग्रुप-D च्या परीक्षा लवकरच होणार
रेल्वे रिक्रूटमेंट सेल (rrc) लवकरच ग्रुप-D भरतीसाठी पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन परीक्षा सुरू करणार आहे.
नवी दिल्ली : रेल्वे रिक्रूटमेंट सेल (rrc) लवकरच ग्रुप-D भरतीसाठी पहिल्या टप्प्यातील ऑनलाइन परीक्षा सुरू करणार आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB)ने डिसेंबर 2020 मध्ये पहिल्या टप्प्यातील भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्या वेळापत्रकानुसार, RRC, NTPC परीक्षा संपल्यानंतर लगेच RRC ग्रुप- D च्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. RRB, NTPC, CBT 1 परीक्षेचे सर्व टप्पे 31 जुलै रोजी संपले आहेत आणि आता ग्रुप डी परीक्षेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून RRC ग्रुप D च्या परीक्षा घ्या अशी मागणी होत होती त्यामुळे या परीक्षा लवकरच होणार असल्याने युवकांनी आनंद व्यक्त केला आहे. rrc ग्रुप d , cbt 1 च्या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या 1 कोटीपेक्षा जास्त असल्याने परीक्षा अनेक टप्प्यांत घेतली जाणार आहे अशी माहिती संबंधित विभागाने दिली आहे. परीक्षेच्या पहिल्या टप्प्याचे आवश्यक वेळापत्रक या आठवड्यात जाहीर केले जाऊ शकते. ज्या उमेदवारांची परीक्षा पहिल्या टप्प्यात होणार आहे, त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेलवर त्याची माहिती पाठवली जाणार आहे.
परीक्षेच्या 10 दिवस आधी परीक्षेचे ठिकाण, सूचना पत्रक किंवा मोफत प्रवास पास जारी केला जाणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या तारखेच्या 4 दिवस आधी दिले जाणार असून, परीक्षेत अनेक पर्यायी प्रश्न विचारले जातील ज्यात 1/4 गुणांचे नकारात्मक गुण देखील असणार आहे. सीबीटी 1 मध्ये पात्र झालेले उमेदवार पुढील टप्प्यातील भरती परीक्षेला बसू शकतील. याबाबतचे सर्व अपडेट्स रेल्वे बोर्डच्या अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर दिले जाणार आहेत.