आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालीना जॉर्जिवा यांनी ही घोषणा केली आहे.
कोरोनाच्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदीचं सावट आहे. येत्या काळात हे सावट आणखी गडद होऊ शकतं. अशा परिस्थितीत काय उपाययोजना करायला हव्यात यासाठी रघुराम राजन यांच्यासह जगभरातील ११ अर्थतज्ज्ञांची सल्लागार समिती बनवण्यात आली आहे.
कोरोनामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अनेक मोठमोठे उद्योग बंद आहेत. त्याचे परिणाम जागतिक पातळीवरही होत आहेत. भविष्यात जगात मोठ्या मंदीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी आतापासूनच उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.